शाळा कॉलेजात असताना माझ्यावर समाजाच्या सेवेचे
चांगले संस्कार होते. अगदी एम.बी.बी.एस. होऊन इंटर्नशिप संपेपर्यंत ते कायम होते.
पण प्रॅक्टिस सुरू करताना, एक विशेष अनुभव आला. त्याचं असं झालं, की दवाखान्याच्या
सजावटीसाठी पडदे लावायचे होते. माझ्या नॉन-मेडिकल भावाने जाऊन ते आणले. पडदे
लावल्यावर लक्षात आलं की एक पडदा कमी पडतोय. म्हणून मी स्वतः त्याच कापडाचा नमुना
घेऊन त्याच दुकानात गेलो. तिथं सांगितलं, “दवाखान्यासाठी पडद्याचं कापड काल नेलं
होतं. थोडं कमी पडतंय, अजून तेच कापड हवंय.” मला कापड मिळालं. संध्याकाळी घरी हिशेब
करताना भावानं सांगितलं की त्याला ते पंचवीस रुपये मीटरने पडलं आणि मला पस्तीस रुपये मीटरला मिळालं. भाऊ म्हणाला,
“बावळट आहेस. तू दवाखान्यासाठी पाहिजे म्हणाला असशील. मग साहजिकच आहे. तो तुला
कापणारच.”
हाच अनुभव मला स्कूटरच्या प्लगमधला कचरा ओळखीच्या मेकनिक काढून काढताना यायचा. इतरांकडून दोन किंवा पाच रुपये, माझ्याकडून दहा. मला लक्षात आलं, की आपण किती अपरिपक्व आहोत. समाजाची सेवा करायची, गरिबांना कमी पैशात उपचार करायचे, वेळेला अडल्या नडल्याला पैसे मागायचे नाहीत, या बाण्याने आपण वागतो आहोत. ते कितपत बरोबर आहे? समाजासाठी आपण कितीही कमी पैशात उपचार केले, तरी आपल्याला ते डॉक्टर म्हणूनच वागवणार. कमी पैशात नाहीतर मोफत सेवा मिळवणे हा त्यांचा हक्क आहे, त्या बदल्यात आपल्याला लुबाडण्याचा हक्कसुद्धा, एकावर एक फ्री असा त्यांना मिळतो. समाजातील वर्किंग क्लासचा आपल्याकडे पाहायचा हा दृष्टिकोन मला अंतर्बाह्य हलवून गेला.
काही वर्षांपासून मी एका प्रतिष्ठित सामाजिक
संस्थेचा सदस्य आहे. समाजातील अतिउच्च उत्पन्न गटातील खूप नामवंत आणि हरहुन्नरी
व्यक्ती त्या संस्थेत आहेत. अशाच एका सभेला मी गेलो. अनेक मेडिकल प्रॉजेक्टमध्ये
डॉक्टरची गरज लागते म्हणून मला खास निमंत्रित करण्यात आले होते. तिथे एका लब्ध
प्रतिष्ठित व्यक्तीशी माझी ओळख करून देण्यात आली. मी त्याच्याशी हस्तांदोलन
केल्यावर त्याने विचारले, “तुम्ही डॉक्टर आहात ना? इथं येण्यापूर्वी हात धुतले
होते ना? नाहीतर मला हात धुवायला लागतील.” त्याच्या या बोलण्यात कुठेही विनोदाचा
लवलेश नव्हता. वाक्बाण थेट माझ्याकडे नजर रोखून विचारला होता. कुणी कौतुक केले तर
आपण म्हणतो, अंगावर मूठभर मांस चढलं. मग या अशा कॉमेंटला काय म्हणायचं? इथं या
बाबानं माझं मांसच नाही, तर सगळी हाडं देखील उतरवली होती.
आपण डॉक्टर म्हणून स्वतःला खूप काहीतरी समजत असतो, आपण एक प्रतिष्ठित वर्गात मोडतो, असाही भ्रम आपल्याला असतो. माझ्या या भ्रमाचा भोपळा असा कैकवेळा या ‘सो कॉल्ड’ उच्च वर्गीयांनी फोडून त्याचा चेंदामेंदा केलाय. आर्थिकदृष्ट्या उच्च असो वा कनिष्ठ असो समाज डॉक्टरांकडे काय नजरेने पाहतो? अशा अनुभवांनी आणि विचारांनी मनात भळभळणारी एक खोल वेदनाच उमटते.
आणखीन एक घटना, अगदी परवाचीच. तरुणाईने
बजबजलेल्या आणि नामवंत कॉलेजेस असलेल्या एका पुण्यातल्या एका रस्त्याने मी
स्कूटरवरून चाललो होतो. रस्त्यावर पलीकडच्या बाजूने, आपल्या सगळ्यांना गुरूतुल्य
असे, पुण्यातले एक नामवंत सर्जन रस्ता ओलांडत होते. तेवढ्यात मोटरसायकलवरून दोन
टारगट तरुण वेगाने आले. आपले ‘सर’ त्यांना धडकता धडकता वाचले. त्यांनी त्या
मुलांकडे त्यांच्या तीक्ष्ण नजरेने पाहिले.
तो पडदेवाला, मेकॅनिक, संस्थेतला श्रीमंत माणूस, रस्त्यावरची टवाळ मुले....साऱ्यांच्या दृष्टीने आपण सामान्य असतो...अगदी अतिसामान्य...लुटण्यास योग्य आणि टोमणे मारायला, शिव्या आणि वेळप्रसंगी मारहाण करायला..एक सॉफ्ट टारगेट..
हाच अनुभव मला स्कूटरच्या प्लगमधला कचरा ओळखीच्या मेकनिक काढून काढताना यायचा. इतरांकडून दोन किंवा पाच रुपये, माझ्याकडून दहा. मला लक्षात आलं, की आपण किती अपरिपक्व आहोत. समाजाची सेवा करायची, गरिबांना कमी पैशात उपचार करायचे, वेळेला अडल्या नडल्याला पैसे मागायचे नाहीत, या बाण्याने आपण वागतो आहोत. ते कितपत बरोबर आहे? समाजासाठी आपण कितीही कमी पैशात उपचार केले, तरी आपल्याला ते डॉक्टर म्हणूनच वागवणार. कमी पैशात नाहीतर मोफत सेवा मिळवणे हा त्यांचा हक्क आहे, त्या बदल्यात आपल्याला लुबाडण्याचा हक्कसुद्धा, एकावर एक फ्री असा त्यांना मिळतो. समाजातील वर्किंग क्लासचा आपल्याकडे पाहायचा हा दृष्टिकोन मला अंतर्बाह्य हलवून गेला.
काही वर्षांपासून मी एका प्रतिष्ठित सामाजिक
संस्थेचा सदस्य आहे. समाजातील अतिउच्च उत्पन्न गटातील खूप नामवंत आणि हरहुन्नरी
व्यक्ती त्या संस्थेत आहेत. अशाच एका सभेला मी गेलो. अनेक मेडिकल प्रॉजेक्टमध्ये
डॉक्टरची गरज लागते म्हणून मला खास निमंत्रित करण्यात आले होते. तिथे एका लब्ध
प्रतिष्ठित व्यक्तीशी माझी ओळख करून देण्यात आली. मी त्याच्याशी हस्तांदोलन
केल्यावर त्याने विचारले, “तुम्ही डॉक्टर आहात ना? इथं येण्यापूर्वी हात धुतले
होते ना? नाहीतर मला हात धुवायला लागतील.” त्याच्या या बोलण्यात कुठेही विनोदाचा
लवलेश नव्हता. वाक्बाण थेट माझ्याकडे नजर रोखून विचारला होता. कुणी कौतुक केले तर
आपण म्हणतो, अंगावर मूठभर मांस चढलं. मग या अशा कॉमेंटला काय म्हणायचं? इथं या
बाबानं माझं मांसच नाही, तर सगळी हाडं देखील उतरवली होती.आपण डॉक्टर म्हणून स्वतःला खूप काहीतरी समजत असतो, आपण एक प्रतिष्ठित वर्गात मोडतो, असाही भ्रम आपल्याला असतो. माझ्या या भ्रमाचा भोपळा असा कैकवेळा या ‘सो कॉल्ड’ उच्च वर्गीयांनी फोडून त्याचा चेंदामेंदा केलाय. आर्थिकदृष्ट्या उच्च असो वा कनिष्ठ असो समाज डॉक्टरांकडे काय नजरेने पाहतो? अशा अनुभवांनी आणि विचारांनी मनात भळभळणारी एक खोल वेदनाच उमटते.
आणखीन एक घटना, अगदी परवाचीच. तरुणाईने
बजबजलेल्या आणि नामवंत कॉलेजेस असलेल्या एका पुण्यातल्या एका रस्त्याने मी
स्कूटरवरून चाललो होतो. रस्त्यावर पलीकडच्या बाजूने, आपल्या सगळ्यांना गुरूतुल्य
असे, पुण्यातले एक नामवंत सर्जन रस्ता ओलांडत होते. तेवढ्यात मोटरसायकलवरून दोन
टारगट तरुण वेगाने आले. आपले ‘सर’ त्यांना धडकता धडकता वाचले. त्यांनी त्या
मुलांकडे त्यांच्या तीक्ष्ण नजरेने पाहिले.
ती आत्मविश्वासपूर्ण नजर एकेकाळी मरणासन्न
रुग्णांना धीर देऊन जीवनदान द्यायची आणि ऑपरेशन थिएटरमध्ये भल्या भल्या डॉक्टरांना चळाचळा कापायला
लावायची. पण त्या युवकांना त्याचं काहीच नव्हतं, ना त्यांच्या वयाबद्दल काही आदर
होता. “ए म्हाताऱ्या, बघून चाल की XXव्या..” यानंतर पुन्हा त्या मुलांकडून काही
शिव्यांची लाखोली. माता-भगिनींचा उद्धार करणारी भाषा वापरत ते तितक्याच वेगाने
निघून गेले. सर दचकून इकडे तिकडे पाहत होते. कदाचित आपल्या अपमानाला कोणी साक्षीदार तर नाही ना?
याची खातरजमा करत होते.
मी स्कूटर लावून त्यांच्या जवळ गेलो. त्यांना
विचारले, “सर लागले तर नाही ना?” त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्या नजरेत अश्रू
तरळल्याचे मला जाणवले.... क्षणभरच पण एक विषण्णता जाणवली. आयुष्यभराच्या
तपश्चर्येचे हेच फळ का? असे भाव मला जाणवले, पण फक्त क्षणभरच... “थँक्यू” ते मला
म्हणाले आणि ताठ मानेने रस्ता क्रॉस करून निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या
आकृतीकडे पाहताना मला जाणवले, डॉक्टरने आयुष्यात कितीही थोर काम करू द्या, रस्त्यावरच्या लोकांच्या दृष्टीने तो कुणीच नसतो. असला तर तो एक म्हातारडा असतो.तो पडदेवाला, मेकॅनिक, संस्थेतला श्रीमंत माणूस, रस्त्यावरची टवाळ मुले....साऱ्यांच्या दृष्टीने आपण सामान्य असतो...अगदी अतिसामान्य...लुटण्यास योग्य आणि टोमणे मारायला, शिव्या आणि वेळप्रसंगी मारहाण करायला..एक सॉफ्ट टारगेट..